rajnath singh says indias defence sector rank in global level pm modi cm shinde fadnavis ajit pawar
rajnath singh says indias defence sector rank in global level pm modi cm shinde fadnavis ajit pawarSakal

Malvan News : संरक्षणात जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावली - राजनाथसिंह

राजनाथसिंह यांचे प्रतिपादन; मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची नऊ वर्षांत प्रगती

Malvan News : संरक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे केले. नौदल दिनाचा दिमाखदार मुख्य सोहळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले, हे आमच्यासाठी सौभाग्याचे आहे. छत्रपतींचे सारे जीवन कार्य आमच्या सर्वासाठी हे प्रेरणादायक आहे. छत्रपतींनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्याची आरमाराची उभारणी केली.

त्याचवेळी नौदलाचे महत्त्व ओळखून भारताच्या समृद्धीमध्ये नौदलाचा नवा अध्याय निर्माण केला. नौदलाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आयएनएस विक्रांत गतवर्षी नौदलाला समर्पित केली आहे.

त्यामुळे आता ‘फायर नेव्ही, बिल्डर नेव्ही’ दिसून येत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या नऊ वर्षांत प्रगती केली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे.’’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यात सत्ता मिळविण्याची जादू पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. तसेच तारकर्ली येथे नौदल दिनाला ते उपस्थित आहेत.

त्यांचे मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत स्वागत करीत आहे. नरेंद्र मोदी म्हणजे गॅरंटीचे दुसरे नाव आहे. त्यामुळे आता ‘हर घर मोदी नाही तर हर मन मोदी’ झाले आहे. त्यांनी देशाला जगात लौकिक मिळवून दिला आहे. आर्थिक प्रगतीत उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे सहकार्य मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले जलदुर्ग ही आमची संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज सागरी आरमाराचे जनक आहेत. त्यामुळे नौसेना दिन महाराष्ट्रात होत असल्याचे समाधान वाटत आहे. आत्मनिर्भर भारत आणि महाशक्ती शाली भारत ही आमची नवीन ओळख निर्माण होत आहे.’’

rajnath singh says indias defence sector rank in global level pm modi cm shinde fadnavis ajit pawar
India Navy Day : शिवरायांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

केद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज १६६४ मध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी येथे आले. सिंधुदुर्ग किल्ला आणि रायगड किल्ला हे हिरोजी इंदुलकर यांनी बांधले. त्यांचा प्रत्यय आज येथे दिसून येत आहे.

शिवाजी महाराजांची शिस्त, निष्ठा आणि प्रेम हे देशप्रेमाचे प्रतीक आहे. चार राज्यांच्या निवडणुकांपैकी तीन राज्यांमध्ये विजय मिळवून पंतप्रधान आज येथे शिव पुतळ्याचे अनावरण करण्यास आले आहेत. आम्हाला त्यांचा गर्व, अभिमान आहे.

rajnath singh says indias defence sector rank in global level pm modi cm shinde fadnavis ajit pawar
Indian Navy Day : सिंधुदुर्गकरांनी अनुभवली नौदलाची ताकद

ते जिथे जातील, तेथे यश मिळवून येतील, असा त्यांचा पायगुण आहे. त्यामुळे आज त्यांनी जो विजय मिळविला, तो नऊ वर्षांत उभे केलेल्या कामातूनच मिळाला. आपला देश आत्मनिर्भर व्हावा, महासत्ता घडावा म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत; त्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावे, ही विनंती आहे.’’

भारताचा नौदल दिन सोहळा मालवण तालुक्यातील जगप्रसिद्ध तारकर्ली पर्यटन ठिकाणी आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. येथे उभारलेल्या संग्रहालयाची मोदी यांनी पाहणी केली.

rajnath singh says indias defence sector rank in global level pm modi cm shinde fadnavis ajit pawar
Raigad News : दाभोळमध्ये अधिकृत रेती विक्री केंद्र सुरू,600 रुपये ब्रास दर; नोंदणीकृत वाहनाद्वारेच वाहतूक

श्री. मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला फुले वाहत नतमस्तक झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, नौदलप्रमुख आर. हरी. कुमार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नौदल वरिष्ठ अधिकारी, राज्याचे वरिष्ठ अधिकारी, खासदार, आमदार तसेच हजारोंनी नागरिक, पर्यटक, परदेशी नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com