रामदास कदम-भास्कर जाधव पुन्हा आमनेसामने

संघर्ष नव्याने सुरू; दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके
shiv sena leader Bhaskar Jadhav Criticism Ramdas Kadam
shiv sena leader Bhaskar Jadhav Criticism Ramdas KadamSAKAL E TEAM

चिपळूण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर सतत आरोप करणारे माजी मंत्री रामदास कदम यांना योग्यवेळी उत्तर देईन,असे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सांगितले होते. मात्र कदमांनी भास्कर जाधव यांच्यावरही निशाणा साधल्यानंतर दोघांमधील शाब्दिक युद्ध पुन्हा सुरू झाले आहे. गणेशोत्सवानंतर कोकणातील हे दोन्ही नेते पुन्हा राजकीयदृष्ट्या भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात दिवाळीपूर्वी राजकीय फटाके फुटणार आहेत. जाधवांची नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि खेडच्या दौऱ्यात कदमांनी भास्कर जाधव यांना चिमटे काढले होते. त्यामुळे गुहागरच्या मेळाव्यात जाधवांनी कदमांचा समाचार घेतला. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला नव्याने सुरवात झाली आहे.

मातोश्रीच्या छत्रछायेखाली वाढलेले रामदास कदम हे ठाकरे कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासू आणि आक्रमक प्रवृत्तीचा नेता म्हणून रामदास कदम यांची ओळख आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांना मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांपासून दूर करण्याचा प्रयत्न मातोश्रीचे विश्वासू म्हणवणाऱ्यांनी केला. त्यांची ही खेळी लक्षात आल्यानंतर रामदास कदमांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाना साधण्याची आयती संधी रामदास कदमांना मिळाली. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावर आहे.जाधवांची नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि खेडच्या दौऱ्यात कदमांनी भास्कर जाधव यांना चिमटे काढले होते. त्यामुळे गुहागरच्या मेळाव्यात जाधवांनी कदमांचा समाचार घेतला. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला नव्याने सुरवात झाली आहे.

मैत्रीत वितुष्ठ

भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम राजकीय वैर जुने आहे. जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर या दोन नेत्यांमधील राजकीय युद्ध रंगले होते. गुहागर विधानसभा मतदारसंघात कदम विरोधी पक्षनेते असताना जाधवांनी त्यांचा पराभव केला. त्याचा राग त्यांच्या मनात अधिक होता; मात्र नंतरच्या काळात दोघांमधील राजकीय वैर संपले. एकमेकांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. शिवसेना दुभंगल्यानंतर पुन्हा हे दोन्ही नेते पुन्हा आमनेसामने आले आहेत.

मातोश्रीचा आशीर्वाद होता, म्हणून रामदास कदम मोठे झाले. ठाकरे कुटुंबाने त्यांना सर्वकाही दिले. त्यांच्या मुलांनाही दिले. दापोली मतदार संघातील जनतेला सर्वकाही माहिती आहे तरीही रामदास कदमांकडून ठाकरे कुटुंबावर होणारी टीका शिवसैनिक विसरणार नाहीत.

- संदेश आयरे, शिवसैनिक पेढे, ता. चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com