1995 प्रमाणे शिवशाही सरकारची पुनरावृत्ती आता होणार - रामदास कदम

 1995 प्रमाणे शिवशाही सरकारची पुनरावृत्ती आता होणार - रामदास कदम

दाभोळ - आगामी निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. 1995 प्रमाणे शिवशाही सरकारची पुनरावृत्ती आता होणार आहे. त्यामुळे पुन्हा कोकणाला झुकते माप मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केले. 

दापोली शिवसेना शहर शाखा येथे बुधवारी (ता. 14) सायंकाळी रामदास कदम यांचे आगमन झाले. दापोली व मंडणगड तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी कदम म्हणाले, आता विरोधकांच्या 52 पिढ्या खाली उतरल्या तरी दापोलीवर भगवा फडकविण्यास आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आपण दापोली विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागाकडून रस्त्यांसाठी 720 कोटी रुपये आणले आहेत. कोणीतरी सांगते मी आणले, पण आता राष्ट्रवादीची सत्ता नाही हे ते विसरले आहेत. दापोली तालुक्‍यात विकासाची गंगा वाहिल्याशिवाय आता राहणार नाही. 

सह्याद्री मिनीडोअर रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक संजय विलणकर यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या 51 सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रिक्षा चालक मालक संघटनेचे व भाजपाचे पदाधिकारी केतन शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह, जालगाव-लष्करवाडी येथील दर्शन विटमल यांच्यासह 34 कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. 

शिवसेनेचा आवाज आता अयोध्येपर्यंत पोचला आहे. शिवसेनेने विकासकामे करून दाखविली म्हणून आपण शिवसेनेवर विश्‍वास दाखवून प्रवेश केला आहे. आपला हा विश्‍वास कधीही खोटा ठरणार नाही. 2019 ला दापोली विधानसभेवर भगवा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

- योगेश कदम, युवा सेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com