Karul Ghat : 'ते' पाचजण ठरले 'संकटमोचक'; तब्बल 350 फुट खोल दरीतून राणे दाम्पत्याला काढलं बाहेर

प्रचंड भीतीच्या छायेखाली असलेल्या राणे दाम्पत्यांला मानसिक आधार देत त्यांना बाहेर काढण्याची पूर्वतयारी सुरू केली.
Karul Ghat Konkan
Karul Ghat Konkanesakal
Summary

करूळ घाटात कोसळलेली मोटारकार साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळली; परंतु या अपघातातील दोघेही बचावले. हा गंभीर प्रकार होता.

वैभववाडी : धो-धो कोसळणारा पाऊस, भयाण अंधार आणि ३५० खोल दरीतून येत असलेली मदतीची हाक ऐकून त्या पाचही जणांचे काळीज पिळवटून गेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते पाचही एका पाठोपाठ एक दरीच्या दिशेने निघाले.

प्रचंड भीतीच्या छायेखाली असलेल्या राणे दाम्पत्यांला मानसिक आधार देत त्यांना बाहेर काढण्याची पूर्वतयारी सुरू केली. आपत्ती पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी त्यांनी निम्म्या अंतरावर त्या दोघांना आणले होते. त्यानंतर आपत्ती पथकाने दोरखंडाच्या साहाय्याने त्या दाम्पत्यांना सुरक्षित बाहेर काढले.

Karul Ghat Konkan
Bus Accident : मुलाला महाविद्यालयात सोडून परतताना काळाचा घाला; बस दुर्घटनेत गंगावणे कुटुंब होरपळले

या अपघातात संकटमोचक ठरलेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल तळसकर, ट्रकचालक तुकाराम कोकरे आणि शिवाजी गायकवाड, अभिमन्यू पाताडे, तेजस जमदाडे या पाचजणांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. कलमठ येथील शेखर राणे (वय ३४) आणि त्यांच्या पत्नी सौ. दर्शना हे दोघे आपल्या ताब्यातील मोटारीतून (क्रमांक एमएच-०४, ईटी-५२३४) कोल्हापूरहून कलमठला निघाले होते.

ता. २९ रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांची गाडी विश्रांती थांब्यानजीक आली. तेथून पुढे येत असताना मोटार दरीत कोसळली. ही मोटार तब्बल ३५० खोल दरीत जाऊन थांबली. मोटार थांबल्यानंतर राणे दाम्पत्यांना सुटकेच्या निःश्वास टाकला; मात्र बाहेर भयाण अंधार, धो-धो पडणारा पाऊस आणि गर्द झाडी यामुळे त्यांची भीतीने गाळण झाली.

या कारच्या पाठोपाठ असलेले ट्रकचालक तुकाराम कोकरे आणि अभिमन्यू पाताडे या दोघांना दरीत प्रकाश दिसला. त्यामुळे त्यांनी थांबून पाहिले असता दरीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. भयाण काळोख, धो-धो पाऊस यामुळे नेमक काय करावे? हे त्यांना समजत नव्हते. एका चालकाने करूळ तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल तळसकर यांना याची माहिती दिल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत ते टॉर्च घेवून घटनास्थळी पोहोचले.

Karul Ghat Konkan
Uniform Civil Code : समान नागरी कायद्यातून RSS विचारांचा अजेंडा; NCP नेते म्हणाले, कायद्याला आमचा विरोध..

दरीतून मदतीसाठी हाक येत होती. याचवेळी शिवाजी गायकवाड हा ट्रकचालक देखील तिथे आला. चौघांनाही वेळ न दवडता दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. हातात आधाराला दोरखंड नाही, त्यात धो-धो पडणारा पाऊस याला न डगमगता एका पाठोपाठ एक दरीत उतरण्यास सुरूवात केली. पावला-पावलावर धोका होता. एखादी लहानशी चूक देखील जीवावर बेतणारी होती; मात्र एकमेकाला आधार देत त्यांनी ३५० फुट खोल दरीत असलेल्या राणे दाम्पत्यांपर्यत पोहोचले.

Karul Ghat Konkan
Kolhapur : उद्धव ठाकरेंचा फेसबुकवरूनच कारभार, म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं; विखे-पाटलांनी सांगितली हकीकत

तिथे पोहोचताच प्रचंड भीतीच्या छायेखाली असलेल्या त्या दोघांना धीर आला. पोलिस कॉन्स्टेबल तळसकर यांनी मानसिक आधार दिला. काही दुखापत झाली का? याची विचारणा केली. त्यानंतर त्या दोघांना बाहेर काढण्याची पुर्वतयारी सुरू झाली. त्या दोघांना आधार देत जवळपास २०० फुट अंतर ते रस्त्याच्या दिशेने आले.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलिस उपनिरीक्षक रोहित खोत, नितीन खाडे, संदीप कांबळे, रमेश नारनवर, अभिजित मोरे, हरेष जायभाय यांच्यासह सह्याद्री जीवरक्षक पथकाचे प्रमुख हेमंत पाटील आणि त्यांचे सहकारी दोरखडांसह पोहोचले. दोरखडांच्या साहाय्याने दोघे तिघेजण दरीत उतरले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Karul Ghat Konkan
Bhaskar Jadhav : 40 आमदार, 13 खासदार फोडून देखील..; भास्कर जाधवांनी शिंदे गटाला दिला स्पष्ट इशारा

नशिब बलवत्तर

करूळ घाटात कोसळलेली मोटारकार साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळली; परंतु या अपघातातील दोघेही बचावले. हा गंभीर प्रकार होता. दरी तर धोकादायक होतीच; पण मुसळधार पाऊस आणि मिट्ट काळोख यामुळे वेळेत मदत मिळणे सोपे नव्हते. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच ते बचावले, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com