'रांगणागड' होतोय इतिहासजमा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष

शासकीय वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या नवनगर प्राधिकरणाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
'रांगणागड' होतोय इतिहासजमा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष
Summary

शासकीय वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या नवनगर प्राधिकरणाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून प्रशस्त अशी निवासस्थाने बांधण्यात आली. यापैकी एक असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या ‘रांगणागड’ हे निवासस्थान देखभाल दुरुस्तीअभावी इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आहे. शासकीय वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या नवनगर प्राधिकरणाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीवेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवासाची सोय व्हावी, यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी मोक्याच्या जागी एकसारखी दिसणारी सहा प्रशस्त निवासस्थाने बांधण्यात आली. या निवासस्थानाला जिल्ह्यातील ऐतिहासिक गड व किल्ले यांची नावे दिली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा शल्य चिकित्सक व अप्पर जिल्हाधिकारी हे अधिकारी या निवासस्थानाचा लाभ घेत आहेत. यापैकी एक असलेले सिंधुदुर्गनगरी येथील `रांगणागड` हे निवासस्थान अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासाठी आरक्षित आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांच्या बदलीनंतर या निवासस्थानाचा वापर झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हे निवासस्थान वापराविना ओस पडले आहे.

'रांगणागड' होतोय इतिहासजमा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष
आजचा बंद फसलेला, जो आहे तो भितीने - चंद्रकांत पाटील

बंगल्याची इमारत ढासळत चालली आहे. त्यामुळे या निवासस्थानाची वेळीच डागडुजी न केल्यास हे निवासस्थान इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. गेली पाच वर्षे या निवासस्थानाचा वापर होत नसल्याने आणि निवासस्थानाची देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सद्यस्थितीत या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. निवासस्थानाचा परिसर जंगलमय झाला आहे. निवासस्थानाची इमारत ढासळत चालली आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकसारखी दिसणारी प्रमुख अधिकाऱ्यांची निवासस्थाने ही सिंधुदुर्गनगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत; मात्र देखभालीकड़े प्रशासनाचे दुलक्ष होत असल्याने `रांगणागड` शासकीय निवासस्थान अखेरच्या घटका मोजत आहे. शासकीय निवासस्थाने इमारती याची देखभाल करणे, ती सुस्थितीत ठेवणे ही जबाबदारी जिल्हा प्राधिकरणाची आहे; मात्र या निवासस्थानाच्या डागडुजीसाठी गेल्या पाच वर्षांत प्रयत्न झालेले दिसत नाही. सिंधुदुर्गनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या या सर्व शासकीय निवासस्थानांचा वापर व्हावा, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. ही निवासस्थाने बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेला शासनाचा लाखो रुपये निधी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, ही अपेक्षा आहे.

'रांगणागड' होतोय इतिहासजमा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष
अजित पवार हुशार राजकारणी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

अधिकाऱ्यांची अनास्था

सिंधुदुर्गनगरीच्या विकासात भर घालण्यासाठी आणि सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्गनगरीत अनेक शासकीय इमारती तसेच प्रकल्प उभारण्यात आले; मात्र आतापर्यंत कोट्यावधी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची तसेच रांगणागड या निवासस्थानाची अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे वाताहात झाली आहे, अशी खंत गावडे यांनी व्यक्त केली.

"नवनगर विकास प्राधिकरणकडे कोट्यवधी निधी अखर्चित पडला असताना, येथील रस्त्यांची, इमारतींची तसेच प्रकल्पांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ विकासकामाचा ठेका मिळविण्यात गुंतले आहेत. त्यामुळे अशा प्रकल्पांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे."

- प्रसाद गावडे, सामाजिक कार्यकर्ते

'रांगणागड' होतोय इतिहासजमा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष
'महाराष्ट्र बंदला बदनाम करण्यासाठी गालबोट लावण्याचा प्रयत्न'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com