मनसे जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कणकवली - सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळच्या येथील कार्यकारी अभियंत्यांना वारंवार धमकी देऊन ५० हजार रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांच्यासह सात जणांवर येथील पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी बुधवारी रात्री पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष श्री. दाभोळकर व अन्य साथीदार अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात आहेत. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. दाभोळकर, महिला पदाधिकारी चैताली भेंडे व अन्य काही कार्यकर्ते काल (ता. १२) सायंकाळी कार्यकारी अभियंता श्री. व्हटकर यांना भेटण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले होते. या वेळी श्री. व्हटकर यांच्याशी शाब्दीक बाचाबाची झाली. तुम्हाला मी पैसे का द्यावेत, असे श्री. व्हटकर यांनी विचारले होते. यावरून श्री. दाभोळकर यांनी साकेडी रस्त्याच्या निकृष्ट कामात तुम्हाला किती पैसे पोचले असा सवाल उपस्थित केला होता. बराच काळ हा वाद सुरू होता. याबाबत श्री. व्हटकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी त्यांना फिर्याद दाखल करावी, अशी सुचना केली होती. यानंतर श्री. व्हटकर यांनी बुधवारी रात्री उशिराने पोलिसात फिर्याद दाखल केली असून यात म्हटले आहे की, संशयित आरोपी श्री. दाभोळकर हे मनसेचे कार्यकर्ते असून आंगणेवाडी जत्रेच्यावेळी मनसे पक्षाचा बॅनर लावण्यासाठी ५० हजार रूपयाची मागणी केली होती. याबाबत गेल्या महिन्यात २० हजार रूपये आपल्या निवासस्थानाकडून श्री. दाभोळकर घेवून गेले होते. यानंतर बुधवारी सायंकाळी एक महिला व अन्य सात इसम असे आपल्या कार्यालयात येवून धमकी दिली तसेच पैसे मागितले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित आरोपींवर खंडणी मागणे, धमकी देणे, संगनमत केल्याबाबबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय जे. एस. भोसले करीत आहेत. 

खंडणीची प्रकरणे बाहेर येणार 
जिल्ह्यात काही ठिकाणी कंपन्या, खासगी ठेकेदारांतर्फे शासकीय कामे केली जातात. अशा कामावर राजकीय मंडळींचा प्रभाव असतो. याला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षातील काही मंडळी दबावतंत्र आणून पैसे उकळतात. यामुळे शासकीय अधिकाऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे, अशा काही प्रकरणांची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे.

Web Title: ransom crime on mns district president