सायबर हल्ल्यात सिंधुदुर्गातील पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

सध्या देशात रँनसमवेअर या सायबर हल्ल्याने धुमाकूळ घातला असून अनेक लोक या हल्याने बळी झाले असून त्यांचे संगणक निकामी झाल्याच्या घटनाही चर्चेत येत आहेत.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतचा संगणक वायरस बाधित झाल्याने त्यातील महत्वाचा सर्व डाटा गायब झाला आहे..

सध्या देशात रँनसमवेअर या सायबर हल्ल्याने धुमाकूळ घातला असून अनेक लोक या हल्याने बळी झाले असून त्यांचे संगणक निकामी झाल्याच्या घटनाही ऐकू येत आहेत. असे असताना सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतचा संगणक रँनसमवेअर सदृश वायरसने बाधित झाला असून तो पूर्णपणे निकामी झाला आहे. अशी माहिती माळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीच्या डाटा ऑपरेटरने दिली आहे.

मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरने नेहमी प्रमाणे कार्यालयात येऊन संगणक सुरू केला असता संगणक सुरू झाला मात्र त्याच्या स्क्रीनवर संगणकातील सर्व माहिती हॅक करण्यात आली असल्याचा संदेश आला..यानंतर संगणक दुरुस्तीसाठी मेकँनीक आणला असता त्याने संगणक सुरू केल्यानंतर सदर संगणक हा वायरसमुळे हॅक झाला असून यावरील सर्व डाटा गायब करण्यात आला आहे. यानंतर हा सर्व प्रकार ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना सांगण्यात आला..

ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर संगणक हा रँनसमवेअर हल्ल्यामुळे निकामी झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत असून सदर संगणक सुरू केल्यास स्क्रीनवर संगणकमधील सर्व माहिती हॅक करण्यात आली असून ती माहिती आपल्याला हवी असल्यास ६०० डॉलर रक्कम खालील ठिकाणी भरा अशी माहिती येत आहे. यामुळे ग्रामपंचायतची सर्व माहिती पुर्णपणे गायब झाली असून यात सुमारे १० हजार जन्म म्रुत्यू दाखले, घरपत्रक उतारे, अनेक प्रकारचे दाखले, अनेक प्रकारच्या नोंदी, महत्वाचे ठराव, इतर माहिती अशी माहिती संगणकातून गायब झाली आहे..यामुळे मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत प्रशासन मोठ्या संकटात सापडले असून आता नव्याने सर्व माहिती जमा करावी लागणार असल्याने डोकेदुखी वाढणार आहे...

Web Title: ransomeware attack in sindhudurg