esakal | कोकणात कमी होत चाललेली पिके लागलीत बहरायला
sakal

बोलून बातमी शोधा

rare crops are shortely found in konkan one lady successfully cultivate various crops in farm

लॉकडाउनच्या दरम्यानच्या वेळाचा सदुपयोग करीत ही कमी होत चाललेली शेती यावर्षी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. 

कोकणात कमी होत चाललेली पिके लागलीत बहरायला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरूख : कोकणात कातळ भाग मोठ्या प्रमाणात असून कातळावरील शेतीला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कातळावरील शेतीचे प्रमाण कमी केले आहे. कातळ भागावर पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असलेली खांबडी, हरीक, नाचणी, तिळाची शेती दुर्मिळ होत चालली आहे; मात्र नावडी जि. प. सदस्य माधवी गीते यांनी लॉकडाउनच्या दरम्यानच्या वेळाचा सदुपयोग करीत ही कमी होत चाललेली शेती यावर्षी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. 

हेही वाचा - नोंदणी नौकांव्यतिरिक्‍त मासेमारीसाठी जाणाऱ्या अन्य नौकांवर कारवाई

कोकणातील कातळावर पूर्वी भल्लोरी गीत म्हणत शेतकरी मोठ्या प्रमाणात खांबडी, नाचणी, हरीक, तिळाची शेती करीत असत; मात्र रानडुक्‍करांचा त्रास आणि मिळणारे उत्पन्न घटत गेल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडू लागली. नावडी जि. प. गट सदस्या माधवी गीते यांनी या शेतीचा अभ्यास केला. लॉकडाउनच्या दरम्यान त्यांनी ही शेती करण्याचे ठरविले. या कामी त्यांना पती गीते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी खांबडी, नाचणी, हरीक आणि तिळाची शेती घेतली आहे. खांबडी, नाचणी आणि हरीकाची शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

हेही वाचा - जठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत 

हरकाची आंबोली कोकणात प्रसिद्ध 

खांबडी ही शक्‍तीवर्धक असून पचायला हलकी असते आणि आजारी माणसाला चांगली. ब्राऊन राइस म्हणून १५० ते २०० रुपयांना ती विकली जाते. हरीकाचा भात मधुमेहासाठी गुणकारी असून हरकाची आंबोली कोकणात प्रसिद्ध आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top