esakal | जठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

on the topic of refinery pramod jathar talk on this tipic uday samant said in ratnagiri

जठार यांनी रिफायनरी समर्थनार्थ बोलतच राहावे. ते बोलले म्हणजे प्रकल्प होणार नाही. 

जठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला. भाजपचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना सत्तेतून उतरल्यावर रिफायनरी प्रकल्प येईल, असे सांगितले होते. याबाबत मंत्री सामंत म्हणाले, जठार यांचे वक्‍तव्य तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. जठार यांनी रिफायनरी समर्थनार्थ बोलतच राहावे. ते बोलले म्हणजे प्रकल्प होणार नाही. 

हेही वाचा - World Tourism Day Special :  रत्नागिरीत पर्यटन व्यावसायाला दोन हजार कोटीचा फटका 

रत्नागिरी उद्यमनगर येथे सुरू केलेल्या महिला रुग्णालयातील कोविड केंद्रात अतिरिक्‍त फिजिशियन, एमबीबीएस डॉक्‍टरांची गरज आहे. डॉ. मतिन परकार हे एकटेच कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला आणखी डॉक्‍टर मिळाले तर उपयुक्‍त होईल. याबाबत मंत्री सामंत म्हणाले, डॉ. परकार यांच्याशी चर्चा झाली असून, खासगी फिजिशियन नियुक्‍तीसंदर्भात लवकरच कार्यवाही होणार आहे. कोविड रुग्णालयातील कंत्राटी डॉक्‍टर्स्‌, कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित काढण्याच्या सूचना नियोजन अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील आयटीआय येथील कोविड केंद्र बंद होणार नाही, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना करू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -  सावंतवाडीत लॉकडाउन नाही 

शुल्कात सवलत

महाविद्यालयांच्या प्रवेश शुल्काबाबत बैठक झाली असून, चार हप्त्यात शुल्क घेतले जाणार आहे. यंदाच्या शुल्कात एक रुपयाचीही वाढ केली जाणार नाही. जिमखाना, ग्रंथालय शुल्क एकूण प्रवेश शुल्कात न आकारण्याविषयी चर्चा सुरू असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top