esakal | मुंबई गोवा महामार्गावरील या घाटात सापडला गोल्डन स्पायडर.....
sakal

बोलून बातमी शोधा

Rare spider golden color  found in Kashedi river on Mumbai Goa highway

खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरिक्षक या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना हा सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोळी आढळून आला

मुंबई गोवा महामार्गावरील या घाटात सापडला गोल्डन स्पायडर.....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड (कोल्हापूर) :  मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोनेरी रंग असलेला दुर्माळ कोळी (स्पायडर) आढळून आला आहे. हा दर्मिळ कोळी कशेडी घाटात कसा आला. आपल्या भागात अशा प्रकाराचा कोळी आढळतो का? हे पाहण्यासाठी आता किटक अभ्यासकांची मदत घेतली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयाचे प्रवेश द्वार असलेलल्या कशेडी घाट येथे पोलीसबंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरिक्षक या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना हा सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोळी आढळून आला.

हेही वाचा- चिपळूणमध्ये रस्त्यावर दरड कोसळली ; हा मार्ग बंद , किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू -

कोकणात आतापर्यंत दोन प्रकारचे कोळी आढळून आले आहेत. आपले घर किंवा आजुबाजुच्या परिसरात तंतूचे जाळे विणणारा कोळी. हा कोळी आकाराने लहान असतो तर दुसरा रानात दोन झाडांच्या मध्ये जाळे विणून राहणारा कोळी.  हा कोळी आकाराने मोठा असतो. मात्र या दोन्ही कोळ्यांचा रंग एकसारखाचा असतो.पोलीस उपनिरिक्षक कदम यांना आढळून आलेला हा कोळी रंगाने अगदीच वेगळा असल्याने हा कोळी नेमका आपल्या भागात आला कुठून याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले ३१ कोरोना पॉझिटिव्ह.... -

loading image