
पाली : सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत च्या तत्कालीन गैरव्यवहार निधीचा अपव्यव व अनियमितता याची पुन्हा चौकशी होणार आहे. यासंदर्भात सर्व अहवालांच्या फेर चौकशीचे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती सुधागड यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (ता. 29) सर्व अहवालांची चौकशी पंचायत समिती कार्यालयामध्ये होणार आहे.