आंदोलन अधिक तीव्र करण्याचा रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 29 मार्च 2018

रसायनी (रायगड) - येथील एचओसी कारखान्यांला सरकारने जमीन विक्रीसाठी दिलेली परवानगी रद्द करावी आणि कंपनीने वापर न केलेल्या जमीन मुळ मालक शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या आणि इतर मागण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आज गुरुवार आंदोलनाचा सातवा दिवस आहे. मात्र शासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तिव्र असंतोष खदखदत आहे. सोमवार ( ता 02 ) पासुन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

एचओसी कारखाना ऊभारण्यासाठी परीसरातील शेतक-यांच्या जमीनी सुमारे साठ वर्षा पुर्वी संपादित करण्यात आल्या आहे. दरम्यान, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था मागील बारा वर्षा पासुन प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या बाबत पाठपुरावा करत आहे. मागण्या बाबत शासन स्तरावर चर्चा बैठका झाल्या आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे तोडगा निघालेला नाही आसा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहे. त्यामुळे  प्रकल्पग्रास्त शेतकरी विकास सामाजिक संस्थाने मागण्यांसाठी गुरुवार ( ता 23 ) पासुन कंपनीच्या प्रवेश व्दारा समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान  उपोषण स्थळी पनवेल किंवा खालापुर तहसीलदार, उपविभागीय आधिकारी, जिल्हाधीकारी कुणीही फिकरले नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त तिव्र संताप व्यक्त करत आहे. तसेच आंदोलनाला परीसरातील नागरिक आणि संस्थांचा पांठीबा मिळत असल्याचे सांगण्यात आले. तर या आठवड्यात आलेल्या सुट्यांमुळे आंदोलन थोडे पुढे ढकलले आहे. सोमवार पासुन तिव्र आंदोलन करण्यात येईल आशी माहिती संस्थेचे खजिनदार दत्तात्रेय शिंदे यांनी दिली आहे. 

एचओसी कंपनीने बीपीसीएला जमीन विकताना ज्या गावातील जमीन देण्यात येणार आहे. त्या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांच्या सूचना आणि हरकती मागविल्या नाही. सरकारने  प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्था यांना अंधारात ठेऊन फसवणुक केली आहे.  रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था, खजिनदार, दत्तात्रेय शिंदे.

Web Title: rasayani project affected farmers agitation