रश्‍मी कशेळकर, डॉ. कलवारी, डॉ. चोरगेंना "कोमसाप'चा पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

रत्नागिरी - रश्‍मी कशेळकर, डॉ. शंकर कलवारी, डॉ. दिलीप पाखरे, डॉ. तानाजीराव चोरगे आदींना "कोमसाप'चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्यिक कर्तृत्वाबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी एकूण 14 जणांना पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरुरकर यांनी दिली. त्यांनी पुरस्कारांची घोषणा केली. 

रत्नागिरी - रश्‍मी कशेळकर, डॉ. शंकर कलवारी, डॉ. दिलीप पाखरे, डॉ. तानाजीराव चोरगे आदींना "कोमसाप'चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्यिक कर्तृत्वाबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी एकूण 14 जणांना पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरुरकर यांनी दिली. त्यांनी पुरस्कारांची घोषणा केली. 

25 व 26 फेब्रुवारीला कोमसापच्या रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच द्वितीय क्रमांकांचे विशेष पुरस्कार तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. 

पुरस्कार असे ः (साहित्यप्रकार, पुरस्काराचे नाव, पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव या क्रमाने) 

कादंबरी- र. वा. दिघे स्मृती पुरस्कार- जिगीषा, आदिनाथ हरवंदे, कादंबरी- वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार- सेतू, तेजस्विनी दिनेश, कथासंग्रह- वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार- कांचनकडा, वनिता देशमुख, कथासंग्रह- विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार- गारपीठ, डॉ. तानाजीराव चोरगे, कविता वाङ्‌मय- आरती प्रभू स्मृती पुरस्कार- अनाहत, ऍड. मंदाकिनी पाटील, कविता संग्रह- वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार- ओळखीच्या खुणा, कै. अविनाश फणसेकर, चरित्र आत्मचरित्र- धनंजय कीर स्मृती पुरस्कार- सह्यगिरीतील गांधी ः आबा नारकर, स्नेहल नेने, चरित्र आत्मचरित्र- श्रीकांत शेट्ये विशेष पुरस्कार- समर्पित जीवन, मनोहर साखळकर, ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार- भुईरिंगण, रश्‍मी कशेळकर, ललित गद्य- सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती विशेष पुरस्कार- शतदा प्रेम करावे, सुरेश ठाकूर, बालवाङ्‌मय प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार- इटुकले पिटुकले लता गुठे, संकीर्ण वाङ्‌मय वि. कृ. नेरुरकर पुरस्कार- पॅनोरमा, डॉ. शंकर कलवारी, संकीर्ण वाङ्‌मय अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार- लेडीज जिम, डॉ. दिलीप पाखरे, नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार- संगीत शिवलीला, प्रतिभा भिडे. 

Web Title: rashmi kashelkar dr kalwari dr chorge komsap award