राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

खेड - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतचे संकेत महादेव जानकर यांनी दिले आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात जिल्हा कार्यकारिणीने महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ही भूमिका उघड केल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी दिली. पक्षाच्या काही उमेदवारांची नावे घोषित झाल्याने त्या-त्या गटात व गणामध्ये हा पक्ष उर्वरित पक्षांशी युती करणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात भाजपाबरोबर सत्तेत आहे. परंतु स्थानिक पातळीवर सन्मानपूर्वक जो आपल्याशी युती करेल त्यांच्याबरोबर जाण्यची आमची तयारी आहे, अशी भूमिका निवडणुका संदर्भात नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीने स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष नेहमीच वंचित, शोषित समाजाच्या पाठीशी राहिला आहे. दुर्गम भागातील रस्ते, विजेची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात निर्णायक आंदोलने केली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर आगामी जि. प. व पं. स. निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भरणे जिप गट- सौ. रमीबाई शाम गवळी, शिरवली पंस गण- सौ. नीता लहू सुर्वे, लोटे जिप गट- गणेश झोरे, आस्तान जिप गट- स्वाती सखाराम गोरे, भोस्ते जिप गट- अनंत खोपकर, भोस्ते पंस गण- श्री. आपटे गुरुजी, लोटे पस गण- विलास गोरे यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. या सर्व उमेदवारांमागे राष्ट्रीय समाज पक्षाची राज्य कार्यकारिणी पूर्ण ताकद उभी करेल अशी ग्वाही ना. जानकर यांनी दिली आहे.

Web Title: Rashtriya Samaj Party will fight on its own