म्हसोबा पेझारी संघ ठरला रासळवाडी जिल्हा स्तरीय कबड्डी चषकाचा मानकरी

अमित गवळे
बुधवार, 16 मे 2018

पाली- सुधागड तालुक्यातील रासळवाडी येथे जय भवानी बाल विकास क्रीडा मंडळ यांच्या वतीने नुकत्याच  जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघ विजेता झाला तर नव यूवक खिडकी संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन सामजिक कार्यकर्ते सतीश देशमुख, ह.भ.प.उमाजी महाराज मोरे, अंतरराष्ट्रीय पंच भगवान शिंदे, सरपंच उमेश म्हस्के, विश्वास देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. अतिशय रोमहर्षक झालेल्या या कबड्डी चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हसोबा पेझारी संघ ठरला. तर उपविजेता नव यूवक खिडकी संघ, तृतीय क्रमांक सोनारसीद्ध धाटाव, चतुर्थ क्रमांक चौडेश्वरी कड्सुरे संघाने पटकावला. तसेच उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक प्रणीत पाटील व उत्कृष्ट पकडचे पारितोषिक सुमित शिर्के यांना मिळाले. 

सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुणे शिवसेनेचे सुधागड तालुका संपर्कप्रमुख विनेश सीतापराव, मुंबई येथील उद्योजक सुहास चिकोडे, दिनेश चिले यांचे हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Raslawadi District Level Kabaddi Player Award