पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स

लहान मुलांना बाधा होणार असली तरी पालकांनी घाबरून जाऊ नये.
पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या (third stage of covid-19) लाटेत लहान मुलांना सर्वाधिक बाधा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेचे नेमके स्वरूप काय असेल, पालकांनी व मुलांनी काळजी (how to care of child) कशा पद्धतीने घ्यावी, खासगी व सरकारी रुग्णालयांच्या (responsibilities of govt. and private hospitals) जबाबदाऱ्या अशा विविध अंगांनी ‘सकाळ'ने बालरोगतज्ज्ञांशी (balneologist) ‘सिटिझन एडिटर’ उपक्रमातून संवाद साधला. ‘गुगल मीट’च्या माध्यमातून झालेल्या संवादातून सर्वांगीण चर्चा झाली. लहान मुलांना बाधा होणार असली तरी पालकांनी (parents pracautions) घाबरून जाऊ नये. किरकोळ सर्दी, पडसे होताच डॉक्टरांकडे अँटिबायोटिक औषधांचा आग्रह धरू नये. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही. मात्र, वर्षभर शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांची मानसिकता बदलली आहे. त्याबाबतही पालकांनी सजग असावे, अशा टिप्स बालरोगतज्ज्ञांनी दिल्या. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी स्वागत केले.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली

कोरोनाचे लहान मुलांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे परिणाम होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध प्रकारच्या लशींमुळे लहान मुलांतील प्रतिकारशक्ती चांगली आहे. आजवरचा अनुभव पाहता कोरोनाचा कमी फटका मुलांना बसला आहे. ही जरी दिलासा देणारी गोष्ट असली, तरी धोका टळलेला नाही. पालकांनी आणि मुलांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना होऊन गेलेल्या मुलांवर चार ते पाच आठवड्यांपर्यंत लक्ष द्यावे. वैद्यकीय निरीक्षणाखाली या मुलांची काळजी घ्यायला हवी. लहान मुलांना अजून कोरोनाची लस दिली नाही, त्यामुळे लहान मुलांना तिसऱ्या लाटेत जपायला हवे.

- डॉ. मोहन पाटील

  • मुलांचे खाणे वाढल्याने लठ्ठपणा वाढतोय

  • विनाकारण अँटिबायोटिकचा मारा नको

  • किरकोळ दुखणे म्हणून मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष नको.

  • मुलांचे टीव्ही, मोबाईल पाहणे कमी करावे

  • बालरोगतज्ज्ञांनी फिव्हर क्लिनिक संकल्पना राबवावी

पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स
काय सांगता! चक्क रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा

नव्वद टक्के मुलांना बाधा होणार नाही

जुलै-ऑगस्टपासून तिसरी लाट येईल आणि त्यात लहान मुलांना अधिक बाधा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते मात्र, सुमारे ९० टक्के मुलांना कोणतीही बाधा होणार नाही. कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, उर्वरित १० टक्के मुलांसाठी उपचाराची तयारी ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जिल्ह्याचा विचार केला, तर पाच हजार मुलांना बाधा झाली आणि त्यातील दीडशे मुलांना जरी व्हेंटिलेटर लागली तरी तेवढी व्यवस्था आपल्याकडे नाही. डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर मुलांची कोरोना चाचणी करून घेण्यास टाळाटाळ करून चालणार नाही. कारण मुलांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे घरातील इतरांना बाधा पोचू शकते.

- डॉ. प्रकाश संघवी

  • सकस आहार, वारंवार हात धुणे महत्त्वाचे

  • थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर घरी ठेवा

  • ताप, थंडी, सर्दी, खोकला, घसा खवखवणे ही प्राथमिक लक्षणे

  • सलग तीन दिवस ताप अाल्यास तपासणी

  • पालकांनी न घाबरता मुलांची चाचणी करून घ्यावी

लहान मुलांमुळे इतरांनाही बाधा शक्य

कोरोना विषाणूंचे वारंवार होणारे म्युटेशन हे चिंताजनक आहे. वास्तवात मोठ्या व्यक्तीच्या घरातील चुका या लहान मुलांत विषाणू पसरवण्यात अधिक भूमिका बजावत आहेत. सध्या कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळणे अधिक महत्त्वाचे असून, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीही यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. कोविड बाधित असताना आणि कोविडमधून बरे झाल्यानंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांनी गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि पालकांनी याबाबत दक्षता राखणे गरजेचे आहे. असे न झाल्यास मुलांबरोबरच या विषाणूची बाधा सर्वाना होण्याचा धोका संभवतो.

- डॉ. सुधीर सरवदे

  • बाहेरून घरी गेल्यावर लगेचच

  • मुलांना जवळ घेणे टाळा

  • लक्षणे जाणवल्यास लगेच वैद्यकीय सल्ला

  • मुलांना सोशल डिस्टंसिंगचे धडे द्या

  • वेष्टनातील खाद्यपदार्थ टाळा

  • आवश्यकतेनुसार सॅनिटायझरचा वापर करा

पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स
कौतुकच! चार महिन्यांच्या बाळाला मिळाला मायेचा हात अन्

झोपेच्या वाढत्या वेळेवर लक्ष गरजेचे

मुलांना ताप, सर्दी, खोकला, जुलाब, धाप लागली तर विनाविलंब डॉक्‍टरांशी संपर्क साधा. कोरोनात ‍बऱ्याच वेळा मुलांना १७, १८ तास झोप लागते किंवा ती पालकांना ओळखत नाही, अशावेळी बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार करावेत. जर मुलांना कोरोना झाला तर त्‍याच्‍यासोबत काळजी घेण्यासाठी आईने सोबत थांबून मुलांना आधार द्यावा. अशा प्रकरणात आई व वडिलांची कोरोना चाचणी करावी. महत्त्वा‍चे म्‍हणजे मुलांना वयस्‍कर आजी, आजोबांपासून दूर ठेवावे. प्रतिकारशक्‍ती कमी असल्‍याने त्‍यांनाही लागण होऊ शकते. मुलांनाही वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापरणे करणे, तसेच मास्‍क लावण्‍यासाठी प्रोत्‍साहित करावे.

- डॉ. संगीता कुंभोजकर

  • पालकांनी न घाबरता मुलांना आधार द्यावा

  • सर्दी, ताप, खोकला लक्षणे असतील तर डॉक्‍टरांशी संपर्क करा

  • मुलांना सकस आहार व भरपूर पाणी द्या

  • जन्‍मजात आजार असणाऱ्या मुलांना जपा

  • केवळ ५ टक्‍के मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते

एकत्रित खेळणे ठरू शकते धोकादायक

१२ ते १८ वयोगटातील मुलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, हेच सर्वाधिक घराबाहेर असल्याचे दिसून येते. एकत्रित खेळ खेळणे, मोबाइलवर गेम खेळणे, कट्ट्यावर एकत्रित बसणे यांच्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची काळजी मुलांसोबत पालकांनीही घ्यावी. लॉकडाउनचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असून पुढे मनोविकार वाढण्याचा धोका आहे. याचा विचार केला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही सीटीस्‍कॅन करू नये. ताप व आजार लपवू नका. ‘डेन्जर सायन्स' म्हणून याकडे पाहिले जाते. सल्ल्याने औषधे घेतली पाहिजेत. ताप जादा काळ राहिल्यास तातडीने तपासणी आवश्यक आहे.

- डॉ. अभिजित पाटील

  • लॉकडाउनचा मुलांच्या

  • मानसिकतेवर परिणाम

  • मुलांचा एकत्रित खेळ धोकादायक

  • मनोविकार वाढण्याची भीती

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सिटिस्कॅन करा

  • ताप व आजार लपवू नका, ते अधिक धोकादायक

पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स
'द फॅमिली मॅन 2' चा नवा मजेदार प्रोमो व्हायरल....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com