कोकणातील जागेसाठी मनसेची राष्ट्रवादीला साथ - वैभव खेडेकर

राजेश कळंबटे
गुरुवार, 3 मे 2018

रत्नागिरी - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मनसेने पाठिंबा देत असल्याचे रत्नागिरीतील मेळाव्यात मनसे नेते खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जाहीर केले. खेडमधील मनसेची सर्वच्या सर्व मते त्यांना देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील स्वयंवर सभागृहात झालेल्या मेळाव्यात श्री. खेडेकर बोलत होते. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खेडेकर यांची एंट्री होताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. भाषणामध्ये त्यांनी केलेल्या जाहीर घोषणनेनंतर एकूणच समीकरण पुढे आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी गणित जुळले. तेच या निवडणुकीतही कायम राहणार असून आगामी 2019 च्या निवडणुकीतही पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. खेडेकर म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या नाते सर्वापुढे आले आहे. ते नाते असेच घट्ट होणार आहे. त्याची प्रचिती पुढील निवडणुकीत येईल. कोकण मतदारसंघातून रिंगणात असलेले अनिकेत तटकरे हे तरुण आहेत. सध्या मंत्रिमंडळात सर्वच वयस्कर मंडळी आहेत. त्यांच्या मताला किंमत नाही. त्यामुळे कोकणचा विकास झाला नाही. त्यामुळे तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, तरच चांगले बदल होतील. अनिकेत यांना निवडून आणण्यासाठी मनसेची सगळी मते पारड्यात टाकू. तसेच अन्य मतेही कशी त्यांना पडतील यासाठी प्रयत्न करू. निवडणुकीत त्यांचा विजय निश्‍चित आहे. 

“आम्ही पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या आघाडीचे वेगळे संकेत दिले होते. त्यामुळे नगराध्यक्ष बसला. स्थानिक पातळीवर त्यांच्यात आघाडी झाली होती. आता स्वराज्य संस्था निवडीत मनसे पाठीशी राहत आहे.”

- सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी

Web Title: Ratmagiri News Vaibhav Khedekar comment