Ratnagiri : जिल्ह्यात ५१ कोरोना प्रतिबंधित क्षेत्र

नवीन ८२ बाधित; बरे होणाऱ्‍यांचा टक्का वाढतोय
ratnagiri
ratnagirisakal

रत्नागिरी : जिल्ह्यात दररोज नव्याने सापडणाऱ्‍या कोरोना बाधितांचा आकडा स्थिर झाला असून अतिदक्षता आणि ऑक्सिजन बेडवरील बाधितांची संख्येतही घट होऊ लागली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची संख्याही ५१ आहे. शनिवारी (ता. २५) दिवसभरात जिल्ह्यात ८२ कोरोना बाधित सापडले असून ५१ जणं कोरोनामुक्त झाले. पाच मृतांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद झाली असून त्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार १७० जणांच्या चाचण्यांमध्ये ८२ बाधित आहेत. यामध्ये मंडणगड २, दापोली ७, खेड १८, गुहागर ११, चिपळूण १५, संगमेश्‍वर ३, रत्नागिरी १५, लांजा ६, राजापूर ५ बाधित आहेत. एकूण चाचण्यात १ हजार १०० आरटीपीसीआरमध्ये ३७ तर अ‍ॅण्टीजेनच्या २ हजार ७० चाचण्यांत ४५ बाधित आहेत. दिवसभरात ५१ जणं कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचा दर ९५.९६ टक्के आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत पावणाऱ्‍यांचा आकडा अस्थिर आहे. आतापर्यंत २ हजार ४१५ जणं कोरोनाने दगावले असून सरासरी टक्केवारी ३.१० आहे. हा टक्का कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न आहेत. जिल्ह्यात विविध केंद्रावर ७२७ जणं उपचाराखाली असून त्यातील २६ जणं अतिदक्षता विभागात आहेत. तसेच ऑक्सीजन बेडवर ६७ जणं आहेत.

९,४६८ ठिकाणी होते प्रतिबंधित क्षेत्र

एकाच गावात, वाडी कोरोना बाधितांची संख्या अधिक असेल तर ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधित म्हणून जाहीर केले जात होते. आतापर्यंत ९ हजार ४६८ ठिकाणी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण २ लाख १२ हजार ८५१ घरे होती. दुसरी लाट ओसरल्यामुळे सध्या कोरोनाचे नवे बाधित कमी येत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित क्षेत्राची संख्याही एकावन्न झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com