esakal | Ratnagiri : अक्षरदेवता श्रीगणेश आद्य लिपिकार
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : अक्षरदेवता श्रीगणेश आद्य लिपिकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्री गणेश केवळ महाराष्ट्राचे लाडके दैवत नसून साऱ्या आशियात त्याची अत्यंत श्रद्धेने पूजा होते.  सर्व कलांचे, विद्यांचे, अधिष्ठान म्हणून गणेशाचे महत्त्व आहे. सर्व गणांचा, अक्षरांचा अधिपती श्रीगणेश होय. श्रीगणेश रंगभूमीचा कर्ता. नटेश्वर, गणांचा अधिपती सेनापती आहे. बुद्धीमान, विघ्नहर्ता, दुःखहर्ता आणि सुखकर्ताही आहे.

- अॅड. विलास पाटणे

ॐकांर प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू मकार महेशू जाणियेला, असं जेव्हा संत तुकाराम म्हणतात, तेव्हा "उदर सामावली जया ब्रह्मांड बीजे, याची प्रचिती येते. श्रीगणेशाला आद्य लिपिकार मानले जाते. देवतांनी विनंती केल्यावर श्रीगणेशांनी व्यासांनी रचलेले महाभारत लिपिबद्ध केले. गणपती अथर्वशीर्ष भारतीय लेखन परंपरेचं स्रोत आहे. भारतामधील सर्व भाषा, लिपी व व्याकरणाचे मूळ आधार अथर्वशीर्ष आहे. ज्ञानातून मोक्ष प्राप्त होतो, या संकल्पेतून गणेशाची व्युतप्ती मान्य केली की, श्रीगणेश “अक्षरदेवता” आहे हे, आपल्या लक्षात येते.

“त्वं ज्ञानमयो विशानमयोSसि”

संस्कृत लिपी देवनागरीची मूळ लिपी असून  तिला गणेशविद्या असेही म्हणतात. आपली भाषा, त्यातील शब्द, उच्चार याचा प्रारंभ ओंकारातून झाला. ''ग'' हे गणेशमंत्राचे मूळ बीज. ग म्हणजे स्वंयभू, शब्दब्रह्म, नादब्रह्म, परब्रह्म आणि परमार्थ या सर्वाच गण अधिष्ठान आहे. गणपतीने ज्या वर्णाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात. त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी व नव्या चिन्हांच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. या लिपीतील  सर्व अ ते ज्ञ अक्षरे वळणदार,  आहेत.  कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरवात केल्याव र लेखणी उचलावी लागत नाही. ५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वतंत्र जोडाक्षरासहित चिन्हे लिहिता येतात. जगातील अनेक लिप्यांमध्ये अशी चिन्हसंपन्नता आढळत नाही. गणपतीने ही वर्णव्यवस्था बनविली, या समजुतीने  तिला  देवनागरी लिपी म्हणतात.

हेही वाचा: गणेशोत्सव: मुंबईत १० ते १९ सप्टेंबर दरम्यान कलम १४४ लागू

प्रचलीत  आख्यायिकेनुसार महर्षी व्यासांना महाभारत महाकाव्य लिहायचे होते. विचार प्रक्रीया न थांबता, अर्थ समजून वेगाने लिहीण्यासाठी श्रीगणेशांना लेखनिक होण्याचे आवाहन केले. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की लिखाण अव्याहत सुरू राहील, यासाठी महर्षी व्यासांना महाभारताची कथा अखंड सांगावी लागणार होती. गणपतीने घातलेली अट पाळतानाही थोडीशी उसंत मिळावी, यासाठी व्यासांनी सुचविले, की महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी  संबधीत  वर्णव्यवस्था व चिन्हे निर्माण करावीत. नवी वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी, जेणेकरून उच्चार व लेखनात सुसंगती येईल. 

श्रीगणेशानी महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना  उच्चारांचे  शरीर शास्त्रीय अवलोकन केले.  मानवी मुखाशी सबंध  आढळलेल्या ध्वनींना स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध मानवी मणक्यांशी होता अशाना गणपतीने व्यंजने मानले. १६ स्वर आणि ३३ व्यंजने, व त्यांच्या चिन्ह संयोगाने  स्वतंत्र अक्षरलिपी  निर्माण झाली. जोडाक्षर संकल्पनाही श्रीगणेशानी  जलदगतीने  लिखाणासाठी निर्माण केली, अशी मान्यता आहे. महाभारत लिहीण्यासाठी श्रीगणेशाना तिन वर्ष लागली. संशोधक गणेशशास्त्रीच्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’  पुस्तकांत, भारतीय व देवनागरी लिपी यातील साम्य दर्शविले आहे.

शल्याने शरीर कापून केलेल्या दुरुस्ती पद्धतीला शल्यकर्म म्हणतात. सुश्रुताने सुरू केलेल्या रुग्णाच्या देखभालीला शुश्रुषा म्हणतात. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यातील ‘ए सा गणेशविद्या’ अशा  संदर्भामुळे  श्रीगणेशांचा  देवनागरी लिपीच्या मूळ वर्ण व्यवस्थेच्या  निर्माणाचा संबध स्पष्ट होतो. लिखाणासाठी उत्तर भारतात भूर्जपत्रे, तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत. भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार,  वर्णाक्षरांच्या वरखाली सहजपणे लिहीता येतात. ताडपत्राची उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दाक्षिणात्य लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे झाले. सुधीर नारखेडे यांचे मते देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणेकडील अक्षरे आढळतात.

ओम नमोजी  आद्या!

वेद प्रतिपाद्या देवा तूची गणेशा! सकलमती प्रकाशू

- संत ज्ञानेश्वर

loading image
go to top