esakal | गणेशोत्सव: मुंबईत १० ते १९ सप्टेंबर दरम्यान कलम १४४ लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Dadar-Flower-Market

गणेशोत्सव: मुंबईत १० ते १९ सप्टेंबर दरम्यान कलम १४४ लागू

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत आजपासून गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi) सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर खबरदाराची उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी कलम १४४ (Section 144) लागू केले आहे. मुंबईत सार्वजनिक उत्सव साजरा करताना कोविड-१९ चा फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai police) खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

गणपतीत मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत गणेश आगमन आणि विसर्जनाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येतात. पण यंदा त्यावर बंदी आहे. कलम १४४ लागू केल्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात कलम १४४ लागू असणार आहे.

हेही वाचा: मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; नव्या नात्यांचा श्रीगणेशा

यंदाचा गणेशोत्सव घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडपांमध्ये दर्शनासाठी जाण्यावर बंदी आहे. ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय. आपण तिसऱ्या लाटेच्याजवळ आहोत. पहिल्या दोन लाटेंचा अनुभव लक्षात घेता तिसरी लाट रोखणे आपल्या हातात आहे असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा: 'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा

दरम्यान पहाटेपासूनच घरोघरी गणरायाचं पूजन सुरु आहे. श्रीगणेशाला समर्पित असलेल्या गाण्यांचे मधुर सूर सकाळपासूनच कानावर येत आहेत. मुंबईत घरगुती गणपतींच्या बरोबरीने सार्वजनिक गणेशोत्सव (Mumbai ganesh festival) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण यंदा कोविडमुळे काही मर्यादा आहेत. अनेक घरांमध्येच कालरात्रीच बाप्पांच्या मुर्ती विराजमान झाल्या आहेत.

loading image
go to top