Ratnagiri Alphonso mango price today in Mumbai
esakal
रत्नागिरी : गुडीपाढव्याच्या दिवशी वाशी येथील बाजार समितीत कोकणातून १३ हजार ९२५ पेटी हापूस आंबा दाखल झाला आहे. गतवर्षी याच दिवशी ४० हजार आंबापेट्या मार्केटमध्ये आलेल्या होत्या. हापूस कमी असल्यामुळे हापूसच्या पेटीचा दर ५ हजार रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत (Alphonso mango price in Vashi market 2026) आहे. दर्जेदार मालाला १२ हजारांपर्यंत दर मिळत आहे.