रत्नागिरी आंबा घाट दुरुस्ती युद्धपातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा घाट

रत्नागिरी : आंबा घाट दुरुस्ती युद्धपातळीवर

रत्नागिरी : गेले चार महिने अवजड वाहनांसाठी बंद असलेला आंबा घाट सुरू करण्याच्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. रस्ता खचलेल्या दोन्ही ठिकाणी गटारामध्ये मोठे पाईप टाकून त्यावर कॉंक्रिटचा वाढीव रस्ता केला जात आहेत. भूवैज्ञानिकांमार्फत सर्व्हे झाल्यानंतर दोन ठिकाणी रिटेनिंग वॉल बांधण्यात येत आहेत. त्यामुळे घाट येत्या काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानंतरच अवजड वाहनांसाठी आंबा घाट सुरू करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात आंबा घाटात दरड कोसळून दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. त्यामुळे आंबा घाटातील वाहतूक काही महिने बंद होती. त्यानंतर रस्त्यावर आलेला मलबा हटवून खचलेल्या भागांची दुरुस्ती करून छोट्या वाहनांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आला; मात्र एसटीसह इतर अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंदच आहे. मोठ्या वाहनांची वाहतूक अजूनही अणुस्कार घाटमार्गे होत आहे.

हेही वाचा: नाशिक : शेतीकर्जाच्या अपहारप्रकरणी दोघांना कोठडी

भूवैज्ञानिकांनी केली पाहणी

रस्ता खचलेल्या दोन्ही ठिकाणची भूवैज्ञानिकांमार्फत पाहणी करून तेथे रिटेनिंग वॉल बांधण्याचा निर्णय झाला. त्याचे काम जोरदार सुरू आहे. रस्ता खचलेल्या दोन्ही ठिकाणी गटारामध्ये मोठे पाईप टाकण्यात आले आहेत. त्यावर कॉंक्रिटीकरण करून रस्ता वाढवण्यात आला आहे. हे काम पूर्ण होताच येत्या काही दिवसांमध्येच आठचाकी वाहनांसाठी आंबा घाट सुरू होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top