शेतीकर्जाच्या अपहारप्रकरणी दोघांना कोठडी | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचडीएफसी बँके

नाशिक : शेतीकर्जाच्या अपहारप्रकरणी दोघांना कोठडी

सटाणा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील बहुचर्चित एक कोटी ४ लाख ४५ हजार रुपयांच्या शेतीकर्ज अपहारप्रकरणी सटाणा न्यायालयाने बँकेच्या संशयित दोन्ही कर्मचाऱ्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

आव्हाटी (ता. बागलाण) येथील शेतकरी सोपान देवाजी भामरे व इतर वीस कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बँकेकडे केली होती. त्यानुसार बँकेचे अधिकारी विशाल अरविंद पठारे यांनी १९ सप्टेंबर २०२१ रोजी सटाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा: सेवा समाप्ती करा, फाशी द्या, पण माघार नाही! आंदोलनकर्ते आक्रमक

या गुन्ह्यातील बँक कर्मचारी संशयित आरोपी मनोज दिलीप मेधने (रा. सरस्वती वाडी, ता. देवळा) व शरद शिवाजी आहेर (रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून बँकेशी आर्थिक अनियमितता व बँकेच्या ग्राहकांना चुकीची माहिती देऊन खोटे व बनावट दस्तऐवज देऊन बँकेची व बँकेच्या ग्राहकांची फसवणूक होईल, असे कृत्य केले. बँकेचे बनावट शिक्के, बनावट लेटरहेड तयार करून बँकेच्या नावाचे बनावट लेटरपॅडवर ना हरकत दाखले, बँकेच्या भरणा पावत्यांवर बनावट सही, शिक्के मारून त्या खरे असल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून रोख स्वरूपात एक कोटी ४ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणी सटाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार तपास करीत आहेत.

loading image
go to top