Who is Bhavesh Chavan?
esakal
रत्नागिरी : वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘री-नीट’ परीक्षेत रत्नागिरीतील विश्वनगर येथील भावेश सुरेश चव्हाण याने महाराष्ट्रात एसटी प्रवर्गातून प्रथम; तर देशात चौथा क्रमांक पटकावला (Ratnagiri NEET Topper 2026) आहे. त्याने ७२० पैकी ६६६ गुण मिळवत ९९.९ टक्के गुण मिळवले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील भावेशने यश मिळवत जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे.