Ratnagiri Coconut Prices
esakal
रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात सण-उत्सवाची रेलचेल सुरू झाली आहे. घरोघरी धार्मिक विधी, देवपूजा, महापूजा, व्रतवैकल्ये आणि विविध सणांची लगबग सुरू असल्याने नारळ व सुक्या खोबऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली (dry coconut rates in Ratnagiri today) आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने नारळ आणि खोबऱ्याच्या दरात चांगलीच तेजी आली असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे.