kokan | काँग्रेसची समन्वय, निवड समिती स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : काँग्रेसची समन्वय, निवड समिती स्थापन

रत्नागिरी : काँग्रेसची समन्वय, निवड समिती स्थापन

रत्नागिरी : काँग्रेसने आगामी पालिका निवडणुकीसाठी (Upcoming municipal elections) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड (Avinash Lad) यांच्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदीने आगामी पालिका निवडणुकीमध्ये नव्या उतरले आहेत. पक्षांतर्गत समन्वय राहावा, यासाठी समन्वय समिती तर उमेदवार निवडीसाठी निवड समितीची स्थापना काँग्रेसने केली आहे.

हेही वाचा: Latur Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट; ज्वारी,गव्हाचे नुकसान

जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या समितींची स्थापना झाली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची ही तयारी आहे. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समितींमध्ये समावेश करून समन्वय व निवड समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

समितीमध्ये ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, निसार दर्वे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ प्रदीप साळवी, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

समितीवर राहणार ही जबाबदारी...

  • नगरसेवक निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे

  • मुलाखती घेणे, जिल्हाध्यक्ष, उमेदवारांमध्ये समन्वय

  • इतर महत्त्वाची जबाबदारीही समितीला देण्यात आली

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top