
Latur Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट; ज्वारी,गव्हाचे नुकसान
वडवळ नागनाथ (जि.लातूर) : घरणी, आष्टा (ता.चाकूर) (Chakur) शिवारात मंगळवारी (ता.११) पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा (Hailstorm) ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट झाली असून, गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वडवळ नागनाथ आणि परिसरात सोमवारी (ता.दहा) सायंकाळपासून वातावरणात बदल (Latur Rain Update) झाला आहे. मंगळवारी पहाटे येथे पंधरा मिनिटे पावसाची भुरभुरी होती. मात्र या परिसरातील घरणी, घारोळा, मोहनाळ, लातूर रोड, कडमुळी, मोहदळ, अंबुलगा, आष्टा, आष्टामोड येथे जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. (Untimely Rain And Hailstorm In Latur District, Jawar, Wheat Damages)
हेही वाचा: सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित
यावेळी पाच ते दहा मिनिटे जबरदस्त गारपीट (Marathwada Weather Updates) झाल्याने घरणी शिवारातील ज्ञानोबा मुरदुले, लिलाबाई शिंदे, आकाश शिंदे, रामदास चलवाड, निवृत्ती मुंगे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेतात उभी असलेली ज्वारी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. दरम्यान, जोरदार वारे आणि अवकाळी पावसासोबतच गारपीट झाल्यामुळे घरणी, लातूर रोड आणि आष्टामोड शिवारात काढणीला आलेली तुर तसेच गहू, हरभरा, करडई, सुर्यफूल आणि टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांचेही नुकसान झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. या गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Web Title: Untimely Rain And Hailstorm In Latur District Jawar Wheat Damages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..