Harnai Fishermen Inspiring Story
esakal
दापोली : समुद्राच्या उदरात दडलेल्या जैवसंपदेचे मोल ओळखत माणुसकीचा अनोखा आदर्श हर्णैतील काही मच्छीमारांनी घालून दिला (Rare Shevanda fish conservation in Maharashtra) आहे. जाळ्यात सापडणारा आणि बाजारात किलोला दीड ते दोन हजार रुपये दर मिळवून देणारा दुर्मीळ ‘शेवंड’ मासा विकून आर्थिक फायदा मिळवण्याऐवजी तो स्वतःच्या पैशाने खरेदी करून पुन्हा समुद्राच्या स्वाधीन करण्याचे काम असलम अकबानी, जयदास चोगले आणि मजिद महालदार हे मच्छीमार करत आहेत. त्यांच्या या कृतीतून सागरी जैवविविधतेच्या संवर्धनाचा एक मोलाचा संदेश दिला जात आहे.