esakal | रत्नागिरीकरांना लॉकडाउनमधून शिथिलता; प्रशासनाचे नवे आदेश जारी
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीकरांना लॉकडाउनमधून शिथिलता; प्रशासनाचे नवे आदेश जारी

रत्नागिरीकरांना लॉकडाउनमधून शिथिलता; प्रशासनाचे नवे आदेश जारी

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने (ratnagiri district) राबवलेला आठ दिवसाचा कडक लॉकडाउन (lockdown) बुधवारी संपल्यानंतर जिल्हावासीयांना प्रशासनाने दिलासा दिला आहे. स्तर चारमध्ये असलेल्या जिल्ह्याला लॉकडाउनमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ पर्यंत आणि शनिवार, रविवारी संचारबंदी (curfew) लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा (laxmi narayan mishra) यांनी आज सायंकाळी हे आदेश जारी केले.

लोकप्रतिनिधींनी आज जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन उद्यापासून जिल्ह्याला लॉकडानमधुन दिलासा देण्याचा निर्णय घेतला. उद्यापासून (१०) सकाळी पाच ते सायंकाळी पाच नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी अत्यावश्यक कारणांशिवाय व आपत्कालिन (emergency services) कारणांशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना त्यानंतर बंद राहतील.

हेही वाचा: ॲसिडचा टँकर दरीत कोसळला; चालक जखमी,भाट्येतील घटना

मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील, रेस्टॉरंटस फक्त पार्सल सेवा सुरु राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने , चालणे , सायकलींग शनिवार व रविवारी बंद राहतील. खाजगी आस्थापना, कार्यालये, सुट देण्यात आली असुन ते सुरु राहतील. मात्र उपस्थिती 25% . खेळ, मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते 9 पर्यंत परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, धार्मिक, राजकीय मेळावे बंद राहतील.

किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा. कृषि व कृषि पुरक सेवा सोमवार ते रविवार सकाळी 9 दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. ई कॉमर्स – वस्तू व सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरु राहतील.

उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी-शर्थी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) 50% क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.)

माल वाहतूक नियमित सुरु राहील. प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास, खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे

नियमित सुरु राहील. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यातून येण्या-जाण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल.

उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी-शर्थी घालून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: अमेरिकेत आज जाहीर होणार महागाईचे आकडे; शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करताना काय असावी स्ट्रॅटेजी?

  • लग्नसमारंभ जास्तीत जास्त 25 जण

  • अंत्ययात्रा,अंत्यविधीला जास्तीत जास्त 20

  • कामगारांची राहणेची सोय असेल तरच बांधकामे सुरु

  • व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स,

  • स्पा, वेलनेस सेंटर्स 50% क्षमतेसह सुरू

  • एसीचा वापर न करणेच्या अटीवर हे सुरु राहील.

  • फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा

loading image