Ratnagiri : अतिक्रमण हटावला विरोधच

नगराध्यक्ष बेंडल यांची भूमिका; मेरीटाईम बोर्डाच्या नोटिसीवर टीका
Beach
Beachsakal
Updated on

गुहागर : पर्यटन विकासामध्ये योगदान असणाऱ्या आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या खोकेधारकांवर अतिक्रमणाची कारवाई होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना या निर्णयाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली. इतके वर्ष कोणतीही कारवाई न करणाऱ्याला मेरीटाईम बोर्डाला अचानक हा विषय कसा आठवला, असाही प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला आहे. खोकेधारकांनी दिलेल्या भाडेपट्ट्यांच्या प्रस्तावावर मेरिटाईम बोर्डाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील विक्रेत्यांनी बांधलेली अनधिकृत बांधकामे हटवावीत, अशी नोटीस मेरीटाईम बोर्डाद्वारे देण्यात आली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले, नगरपंचायतीने पथदीप व हायमास्क दिवे लावण्यासाठी उभ्या केलेल्या खांबांचे संरक्षण करण्यासाठी चौथरे बांधण्याची परवानगी मेरीटाईम बोर्डाकडे नगरपंचायतीने मागितली आहे. ही परवानगी अजून मिळालेली नाही. गेली अनेक वर्षे किनाऱ्याची धूप होत असल्याने सुरु पडत आहेत. ही धूप थांबविण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्वाकडे मेरीटाईम बोर्डाचे लक्ष आहे का, असा प्रश्र्न पडतो.

ते पुढे म्हणाले, हे खोकेधारक स्वत:चे, दुकानाचा समुद्राच्या लाटांपासून बचाव व्हावा, म्हणून दरवर्षी स्वखर्चाने काही ना काही उपाय योजना करत आहेत. म्हणून या परिसरातील सुरुबन टिकून आहे. पर्यटन विकासामध्ये खोकेधारकांचे योगदान आहे. गुहागरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे काम ते करतात. जीवरक्षकांना मानधन देण्यासाठी नगरपंचायतीला सामाजिक संस्था, देवस्थाने, पर्यटन व्यावसायिकांबरोबरच या खोकेधारकांनीही आर्थिक मदत केली आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे.

छोटे खोकेधारकही आर्थिक संकटात

मार्च २०२० पासून कोरोना संकटात घातलेल्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय थांबला. तीन मोठे पर्यटन हंगाम हातातून गेले. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांबरोबरच हे छोटे खोकेधारकही आर्थिक संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर अनधिकृत खोक्यांवर कारवाई करणे अयोग्य आहे. नगराध्यक्ष म्हणून मी या कारवाईच्या विरोधात आहे. खोकेधारकांनी दिलेल्या भाडेपट्ट्यांच्या प्रस्तावावर मेरिटाईम बोर्डाने तातडीने कार्यवाही करावी. त्यातून शासनाला उत्पन्न मिळेल. अशी माझी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे.

Beach
मुणगे : रापणीची जाळी लाटांमुळे तुटली

बेंडल म्हणाले

  1. खोकेधारकांमुळे परिसरातील सुरुबन टिकून

  2. पर्यटन विकासामध्ये खोकेधारकांचे योगदान

  3. समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे करतात ते काम

  4. जीवरक्षकांच्या मानधनासाठी खोकेधारकांची मदत

  5. १०० पेक्षा अधिक कुटुंबांचे व्यवसायांवर अवलंबत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com