युरोपमधील निर्यातीपुढे डागी हापूसचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

रत्नागिरी - ॲथ्रॉक्‍सनोजच्या प्रादुर्भावामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यातीत मोठी घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. युरोपमध्ये पाठविण्यात येत असलेला माल डागी निघत असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. वातावरणामुळे यावर्षी ४० टक्‍के उत्पादन घटले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत हापूसचा दर बाजारात एक हजार रुपयांनी 
चढाच आहे.

ओखी वादळानंतर आंबा हंगामाला धक्‍का बसला. गुढीपाडव्याला वाशी मार्केटमध्ये एक लाख पेट्या पाठविण्यात येतात; मात्र यावर्षी साठ टक्‍केच पेट्या पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात जाईल, अशी शक्‍यता होती; मात्र आठ ते दहा दिवसांनी ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने त्याचा हापूसवर परिणाम होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५० हजार पेट्या वाशी बाजारात कोकणातून जात आहेत.

Web Title: ratnagiri europe dagi hapus mango