Kokan News: पैसे न दिल्यानं वडिलांना मुलानेच घरावरून ढकललं, रात्रभर तळमळत राहिले; दुसऱ्या दिवशी नेलं रुग्णालयात

Financial Dispute Escalates into Violence: रत्नागिरीतील कुवारबावमध्ये पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांवर धक्काबुक्की केली; वडील दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाले.
Kokan News

Kokan News

esakal

Updated on

रत्नागिरी: शहरातील कुवारबाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत, या रागातून मुलाने आपल्या वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com