Ratnagiri crime : मारुती मंदिराजवळ पुन्हा भीषण आग! सलग तिसऱ्या दिवशी लागलेल्या आगीने नागरिकांमध्ये भीतीचं सावट
Fire Breaks Out Near Maruti Mandir : छतांवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली; परंतु पालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ही आग आटोक्यात आणली.
रत्नागिरी : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही आगीची घटना घडली. मारुती मंदिर शिवाजी क्रीडांगण परिसरातील गाळ्याच्या ठिकाणी मोठी आग लागली. यात स्फोट झाल्यामुळे अनेकांची धावपळ झाली.