Ratnagiri : दोन एस.टीं.ची धडक, ४१ प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

Ratnagiri : दोन एस.टीं.ची धडक, ४१ प्रवासी जखमी

गुहागर : तालुक्यातील आरे-नागदेवाडी येते दोन एस.टीं.चा समारोसमोर धडकल्याने झालेल्या अपघातात २ चालकांसह ४१ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. अपघाताचे वृत्त कळताच आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरने तातडीने वैद्यकीय सेवा पुरवली. अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या १९ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी असलेल्या एका महिलेला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे रानवीच्या दिशेने जाणाऱ्या शृंगारतळी-अंजनवेल एस.टी.ला शृंगारतळीकडे जाणाऱ्या धोपावे-चिपळूण एस.टी.ने समोरून धडक दिली. धोपावे-चिपळूण एस.टी. संतोष उकार्डे चालवत होते. या गाडीत ३२ प्रवासी होते. श्रृंगारतळी-अंजनवेल एस.टी.वर चालक म्हणून डी. एल. भोसले होते. या गाडीत १२ प्रवासी होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास वळणावर हा अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसमधील प्रवासी समोरच्या सीटवर आदळले. त्यामुळे सर्व प्रवाशांच्या नाकातोंडाला जखमा झाल्या. अपघाताचे वृत्त आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज इंजे यांनी रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवली. जखमींची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. इंजे यांनी कोकण एलएनजीचे अधिकारी रेड्डी यांना कळवले. रेड्डी यांनी त्यांची रुग्णवाहिकाही पाठवून दिली.अधिक उपचाराची गरज असलेल्या २२ जखमींना रुग्णवाहिका व एसटीने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे आणण्यात आले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगर पंचायतीमधील गटनेते उमेश भोसले, श्रद्धा घाडे, शार्दुल भावे, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के ग्रामीण रुग्णालयात पोहोचले

वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने जखमींच्या ओठ, नाक यांना टाका घालण्याचे काम केले. २२ पैकी २१ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले तर ४५ वर्षीय सुहासिनी सैतवडेकर यांच्या उलट्या थांबत नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले असल्याचे डॉ. बळवंत यांनी सांगितले.

अपघातातील जखमींची नावे :

कैलास तुकाराम नायनाक (वय ५०, रा. पालशेत), प्रसाद महादेव वायंगणकर (३२, दाभोळ), साहील पालकर (१८, पालपेणे), सुनंदा गावणकर (८०, रानवी), शकुंतला शिगवण (७५, रानवी), महमंद बामणे (७०, दाभोळ), अश्फाक कुपे (४९, शृंगारतळी), अनिल मोहित (४५, कोथरुड), विलास साळवी (४५, मार्गताम्हाणे), प्रगती भेकरे (५०, रानवी), पार्वती चोगले (७५, रानवी), पद्मजा तांडेल (७७, वेलदूर), योगिता वणकर (२५, नवानगर), कोमल पवार (१८, वेलदूर), नम्रता पवार (४५, घरटवाडी), प्रांजली भोरजी (१९, धोपावे), प्रज्ञेश पाष्टे (१८, खामशेत), आसावरी कदम (४१, वेलदूर), संतोष उकार्डे (५३, आबलोली), अथर्व यादव (१६, पालपेणे), आदेश वाड्ये (३८, अंजनवेल), श्रेया बागकर (१५, अंजनवेल), सानिका भुवड (१७, पवारसाखरी), सानिका शितप (१७ पवारसाखरी), चंदना दणदणे (१६ पवारसाखरी), समिक्षा पवार (१६, पवारसाखरी), सानिका झगडे (१६, पवारसाखरी), साहिल भुवड (१७, पवारसाखरी), सुहासिनी सैतवडेकर (४५, अंजनवेल), सायली डांगे (४१, अंजनवेल), सुगंधा कदम (८०, वेलदूर), आकांक्षा राठोड (१९, आगरवायंगणी), आयुष पवार (२०, घरटवाडी), प्रतीक भावे (१६, खामशेत), मधुकर पारधी (७३, धामणदेवी), शंकुतला सैतवडेकर (६५, अंजनवेल), सायली सैतवडेकर (१०, अंजनवेल).

एसटीची मदत

गुहागरचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी अपघातग्रस्तांना तातडीची मदत म्हणून ५०० रुपये देण्यात आले. या मदतीसोबतच अधिक उपचार किंवा औषधांची गरज असेल तर त्यासाठी स्वतंत्र फॉर्मही सर्व रुग्णांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri Guhagar Accident By Two St Bus 41 Passengers Injured Including 2 Drivers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..