

A man in Ratnagiri is allegedly cheated of ₹1.10 crore through promises of government jobs and a clothing franchise.
sakal
रत्नागिरी: सरकारी नोकरी मिळवून देण्याचे तसेच मंत्रालयात उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल एक कोटी दहा लाख एक हजार ८३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आकाश प्रकाश रसाळ (रा. सरोदेवाडी, परटवणे, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.