रत्नागिरीत 30 जुलैला 'बोलावा विठ्ठल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रत्नागिरी- पंचम निषाद निर्मित "बोलावा विठ्ठल‘ हा अभंगवाणीचा सदाबहार कार्यक्रम रत्नागिरीत रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका देवकी पंडित व किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या दैवी स्वर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

रत्नागिरी- पंचम निषाद निर्मित "बोलावा विठ्ठल‘ हा अभंगवाणीचा सदाबहार कार्यक्रम रत्नागिरीत रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका देवकी पंडित व किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या दैवी स्वर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने "बोलावा विठ्ठल‘ कार्यक्रम भारतभर रसिकांसाठी पर्वणी ठरला. या कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यातील पुष्प 30 जुलैला सायंकाळी 6 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. संतांनी लाडक्‍या विठूरायाप्रती असलेली निष्ठा, भक्ती, प्रेम अशा विविध भावरसांनी ओतप्रोत भरून अजरामर केलेले अभंग आजही रसिकाच्या मनात तीच भावना जागृत करतात. या रचनांना श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी आमोणकर अशा कलाकारांनी चढवलेला स्वर्गीय स्वरसाज अलौकिक अनुभूती देऊन जातो. कार्यक्रमात दोन्ही गायकांचे ताकदीचे सादरीकरण रसिकांना भक्तिरसात चिंब करेल. यात साई बॅंकर (तबला), आदित्य ओक (हार्मोनिअम), प्रकाश शेजवळ (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (साईड ऱ्हिदम) आणि पारस नाथ (बासरी) यांची अप्रतिम वाद्यसंगत लाभणार आहे. 

पंचम निषाद प्रस्तुत या कार्यक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. शशी व्यास यांच्या संकल्पनेतून यंदा आषाढीनिमित्त महाराष्ट्रासह सुरत, बडोदा, अहमदाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, हैदराबाद तसेच बंगळूर येथे हाऊसफुल्ल कार्यक्रम झाले. 31 ला सावंतवाडीमध्ये कार्यक्रम होत आहे. स्थानिक आयोजनाची धुरा "मारवा‘ संस्था सांभाळत आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका व इतर माहितीसाठी मारुती मंदिर येथील केळकर उपाहारगृह किंवा हरेश केळकर यांच्याशी संपर्क साधावा. 

Web Title: Ratnagiri July 30 "bolava Vitthal '