रत्नागिरी जिल्ह्यात ६३ धरणांमध्ये ५४ टक्‍के साठा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

रत्नागिरी - जून महिना संपत आला तरीही मुसळधार पावसाने आतापर्यंत जिल्हावासीयांना हुलकावणी दिली आहे; मात्र धरण क्षेत्रामध्ये अधूनमधून पडणाऱ्या सरींनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाच धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील ६३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ५४ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद साडेपाचशे मि.मी. झाली होती. यावर्षी ती ४९९ मि.मी. आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमीपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मान्सून दाखल झाला, पण त्याचा प्रभाव जास्त काळ टिकला नाही. अधूनमधून पडणाऱ्या सरींनी लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील साठ्यात वाढ झाली आहे. ही समाधानकारक बाब आहे. धरणात पाणी भरू लागल्याने टंचाईचे संकट टळले आहे. अनेक भागातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांसह लघुपाटबंधारे प्रकल्प ६३ आहेत. त्यातील सुकोंडी, पंचनदी, शीळ, मुचकुंदी, ओझर, कळझोंडी धरणात शंभर टक्‍के पाणीसाठा झाला आहे.

सांडव्यावरून पाणी वाहून लागले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. धरण क्षेत्राजवळील आणि त्या प्रवाहाशेजारील भातशेतीला हे पाणी उपयुक्‍त आहे. पाऊस अधूनमधून दडी मारत असल्याने पाण्याचा प्रश्‍न बळीराजाला सतावतो आहे. तो धरणे भरू लागल्याने सुटला आहे. सर्व धरणांमध्ये मिळून २४३.२४ दलघनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण साठ्याच्या ५४.७२ टक्‍के साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: ratnagiri konkan news 54% water stock in 63 dam