गुलाबपुष्पांच्या दुनियेत रमले रत्नागिरीकर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

रत्नागिरी - लाल, पिवळा, काळा, गुलाबी, दुरंगी अशा अनेकविध रंगांतील गुलाबपुष्प पाहून रत्नागिरीकर मोहित झाले. पुष्परचना, पुष्परांगोळी, शोभिवंत कुंड्या व त्यातील फुलेसुद्धा मनाला भावली. गुलाब किंगचा मान स्मिता पानवलकर, क्विनचा मान पराग पानवलकर यांनी पटकावला. निमित्त होते रोझ सोसायटी आयोजित पुष्पप्रदर्शनाचे.

रत्नागिरी - लाल, पिवळा, काळा, गुलाबी, दुरंगी अशा अनेकविध रंगांतील गुलाबपुष्प पाहून रत्नागिरीकर मोहित झाले. पुष्परचना, पुष्परांगोळी, शोभिवंत कुंड्या व त्यातील फुलेसुद्धा मनाला भावली. गुलाब किंगचा मान स्मिता पानवलकर, क्विनचा मान पराग पानवलकर यांनी पटकावला. निमित्त होते रोझ सोसायटी आयोजित पुष्पप्रदर्शनाचे.

गोदूताई जांभेकर विद्यालयात दिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. सुमारे दोनशे गुलाब या स्पर्धेत सहभागी झाले. विविध रंगी फुले पाहून मन टवटवीत झाले. दरवर्षी या स्पर्धेतून बागबगीचा करणाऱ्यांना संधी मिळते. 
फुलांसहित कुंड्या स्पर्धेत सुधीर मुळ्ये, रफिका डिंगणकर, अनिस गिनीवाले, फुलेविरहित कुंड्यांमध्ये स्मिता पानवलकर, शिवानी पानवलकर, धरमसी चौहान यांना बक्षीस मिळाले. पुष्परचना स्पर्धेत समिता शेटे, रसिका तेरेदेसाई व रफिका डिंगणकर यांना, पुष्परांगोळी स्पर्धेत प्रिशा गांगण, श्रुतिका सावंत, अक्षता जाधव यांना पारितोषिक देण्यात आले.

मिनिएचर गुलाबमध्ये प्रथम अनिस गिनीवाले, व द्वितीय, उत्तेजनार्थ अशी दोन्ही पारितोषिके रफिका डिंगणकर मिळाली. हॅंगिंग कुंड्यांमध्ये स्वयम पानवलकर, रफिका डिंगणकर, उत्तेजनार्थ रफिका डिंगणकर, दुरंगी गुलाबमध्ये अनिस गिनीवाले यांना पहिले दोन क्रमांक व उत्तेजनार्थ सांडीम यांना बक्षीस दिले. फ्लोरिबंडामध्ये रफिका डिंगणकर, स्मिता पानवलकर व सुधीर मुळ्ये यांना बक्षीस दिले. 

रंगानुसार गुलाबांना बक्षीस दिले. यात लाल, पिवळा विनय गांगण, काळा सुधीर मुळ्ये, पांढरा, गुलाबी, जांभळा अनिस गिनीवाले यांना व नवोदित म्हणून स्नेहा कारेकर यांना गौरविण्यात आले.

बक्षीस वितरणासाठी लायन्स क्‍लबचे अध्यक्ष राजन मोरे, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष नीलेश मुळ्ये, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी भावे, रोझ सोसायटीचे अध्यक्ष सुधीर मुळ्ये, सचिव सौ. पानवलकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. किरण मालशे, विजय डोंगरे, मनोज दामले, डॉ. संतोष बेडेकर, सौ. नीता सोमशेट्टी, सौ. दीपा भोगटे यांनी केले.

Web Title: ratnagiri konkan news flower exhibition