अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

रत्नागिरी - अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास आज दहा वर्षांची सक्तमुजरीची शिक्षा ठोठाविण्यात आली. महेश तुकाराम पवार (वय 31, पाली) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश वर्ग दोन व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. दीक्षित यांनी ही शिक्षा सुनावली.

पॉस्कोअंतर्गत जिल्ह्यातील पहिली मोठी शिक्षा आहे. तालुक्‍यातील पाली येथे ऑक्‍टोबर 2015 मध्ये वरद हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. महेश पवार याचे मे 2015 पासून जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने त्याला नकार दिला. याची चीड महेशच्या मनात होती. वरद हॉटेलच्या वरच्या माळ्यावर संबंधित मुलगी एकटी असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याचा फायदा उठवत त्याने शटर अर्धवट ओढून त्या मुलीवर अत्याचार केला. तसेच तिला धमकी दिली. अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Web Title: ratnagiri konkan news punishment to criminal