UNESCO tentative heritage sites in Maharashtra
esakal
रत्नागिरी : सध्या जगभरातील पर्यटक गर्दीच्या व्यावसायिक पर्यटनस्थळांऐवजी शाश्वत आणि वेगळ्या अनुभवांच्या शोधात (Astro tourism in Ratnagiri) आहेत. अशा वेळी युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसायादीत समाविष्ट असलेली रत्नागिरीतील कातळशिल्पे पर्यटकांना एक दुर्मीळ दुहेरी पर्वणी देतात. दिवसा प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि रात्री सखोल अवकाशदर्शन. रत्नागिरी जिल्हा आता कातळशिल्पांच्या ठिकाणी अनुभवाधारित पर्यटनासाढी एक नवे दालन खुले करत आहे ते म्हणजे खगोल पर्यटनाचे.