Anjanari Ghat accidents on Mumbai-Goa Highway
esakal
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी घाटातील तीव्र उतार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या महिनाभरात येथे सहा अपघात झाले असून, नऊ ट्रकचालक जखमी झाले (Anjanari Ghat truck accidents latest news) असून, एकाचा मृत्यू झाला आहे. वारंवार अपघात होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.