रत्नागिरीत फेब्रुवारीत साहित्य-नाट्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

रत्नागिरी - महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखा व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे युवा साहित्य व नाट्यसंमेलनाचे आयोजन केले आहे. येत्या 25 व 26 फेब्रुवारीला संमेलन रंगणार आहे. यासाठी इच्छुक साहित्य, नाट्यप्रेमी, नाट्यसंस्था, सभासदांची सभा येत्या शुक्रवारी (ता. 13) सायंकाळी 6.15 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. 

यापूर्वी रत्नागिरीमध्ये अ. भा. नाट्य संमेलनही यशस्वी झाले आहे. नाट्य परिषद आणि साहित्य परिषद आपापले कार्यक्रम आयोजित करत असते. पण दोन्ही संस्थांनी हातात हात घालून एकत्रित उपक्रम आयोजित करण्याच्या हेतूने यंदा प्रथमच साहित्य, नाट्य संमेलन आयोजित करण्याचे ठरले. 

आजच्या युवा पिढीला प्रोत्साहित करणे आणि साहित्य, नाट्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पटवून देण्याचा युवा साहित्यिकांना व नाट्यप्रेमींना सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संमेलनाकरिता गंगाराम गवाणकर, संदीप खरे, जयंत सावरकर, विश्‍वास नांगरेपाटील आदी नामवंत व्यक्तींची उपस्थित अपेक्षित आहे. हे संमेलन रत्नागिरीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आयोजनाकरिता होणाऱ्या सभेला व संमेलनाला जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषद व मसापने केले आहे. 

Web Title: Ratnagiri literature-theater meeting in February