Ratnagiri ACB raid on regional port officer
esakal
रत्नागिरी : परदेशी जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स’ देण्यासाठी ८० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपतच्या कारवाईत सापडलेल्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा वर्ग-१ प्रादेशिक बंदर अधिकारी आणि त्यांचा खासगी मध्यस्थ यांच्या रत्नागिरीसह मुंबईतील घरांची झडती घेण्यात आली (Ratnagiri ACB raid on regional port officer) आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७) आणि मध्यस्थ मिलिंद तुकाराम बनप अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराची रत्नागिरीत शिपिंग एजन्सी असून, त्यांच्यामार्फत परदेशी जहाजांना सेवा दिली जाते.