Ratnagiri MIDC water storage 2026
esakal
रत्नागिरी : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीसंकटात रत्नागिरीतील उद्योग आणि ग्रामपंचायतींसाठी अत्यंत दिलासादायक बाबसमोर आली (Ratnagiri MIDC water storage 2026) आहे. रत्नागिरीतील मिरजोळे आणि उद्यमनगर एमआयडीसीसह लगतच्या काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या पाच प्रमुख धरणांमध्ये सध्या २५.३७ लाख क्युबिक मीटरएवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध साठा आगामी मे ते जून महिन्यापर्यंत पुरेल, या दृष्टीने एमआयडीसी प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे.