Ratnagiri News: रत्नागिरीत राजकीय ताकदींची चुरस! महायुती आणि महाविकास आघाडीत नगराध्यक्षपदासाठी चढाओढ
Ratnagiri politics: रत्नागिरीतील पालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर नव्हे, तर राजकीय ताकद आणि व्यक्तिगत जनसंपर्काच्या लढतीवर आधारित असेल; महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे.
रत्नागिरी: पालिकेची निवडणूक विकासात्मक कमी आणि स्पर्धात्मक लढतीनेच अधिक रंगणार आहे. शहराचा विकास अगदी ‘स्मार्टसिटी’पर्यंत आल्याचा दावा केला जात आहे. पर्यटनवाढीच्यादृष्टीनेही विकासकामे, नव्या थीम राबवल्या गेल्या आहेत.