ट्रकवर झाड कोसळले; क्‍लिनर मृत, चालक जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

राजापूर तालुक्‍यातील रायपाटण टक्केवाडी येथे ट्रकवर वडाचे मोठे झाड कोसळून झालेल्या अपघातामध्ये क्‍लिनर जागीच मृत्युमुखी पडला; तर चालक गंभीर जखमी झाला

रत्नागिरी:- राजापूर तालुक्‍यातील रायपाटण टक्केवाडी येथे ट्रकवर वडाचे मोठे झाड कोसळून झालेल्या अपघातामध्ये क्‍लिनर जागीच मृत्युमुखी पडला; तर चालक गंभीर जखमी झाला.

पेण येथील गणपती या ट्रकमधून नेले जात असताना हा अपघात झाला. जखमी चालकास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Ratnagiri News: 1 dead in an accident