केरळमधील नौकेवर परवाना नसल्याने कारवाई

 चंद्रशेखर जोशी
शुक्रवार, 16 मार्च 2018

दाभोळ - केरळ राज्यातील कोझीकोडी येथील एका मच्छीमारी नौकेचे हर्णै किनाऱ्याजवळ सुकाणूच तुटल्याने या नौकेला हर्णै बंदराचा आश्रय घ्यावा लागला होता. मात्र या नौकेवरील खलाशांकडे मच्छीमारीचे परवानेच नसल्याने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. 

कोकण किनारपट्टीवर स्थानिक आणि परप्रांतीय बेकायदा पर्ससीन मच्छीमारी नौकांविरोधात वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर हर्णै किनाऱ्याजवळ केरळच्या विनापरवाना फास्टर अर्थात जलद मच्छीमारी नौकेचे प्रकरण उघड झाल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली होती. या नौकेचे सुकाणूच बिघडल्याने खलाशांना हर्णै बंदर गाठावे लागले. सुदैवाने परवाना अधिकारी राजकुमार महाडिक कामानिमित्त रत्नागिरीतून दापोलीत आलेले असल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या राज्यातील नौकेची तपासणी केली. त्यात या नौकेवरील खलाशांकडे मच्छीमारीचा परवानाच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

विशेष म्हणजे कोणाकडेच विम्याची कागदपत्रेही नसल्याचे उघड झाले. केरळच्या कोझीकोडी येथील अब्दुल लतीफ यांच्या मालकीची ही नौका असून नौकेसोबत दोन छोट्या बोटीही होत्या. हर्णै येथे आलेल्या या नौकेवरील मासळीसाठ्याचा लिलाव करून जमा झालेले सुमारे 1 लाख 67 हजार रुपये सरकारजमा करण्यात आले. तेवढीच रक्‍कम दंड म्हणून भरण्याचा आदेश दापोलीच्या तहसीलदारांनी दिला. 

Web Title: Ratnagiri News action on Kerala fishing Ship