रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍हा विकासासाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिवांची आज रत्नागिरीत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक क्षेत्रांचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा महिन्यांमध्ये आराखडा तयार करून दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिवांची रत्नागिरीत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक क्षेत्रांचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा महिन्यांमध्ये आराखडा तयार करून दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

नागरी हवाई वाहतूकमंत्री तथा वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय अधिकारी व प्रतिनिधींची ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ झाली. त्या-त्या खात्याचे त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र शासन स्तरावरील सचिव सुधांशू पांडे, राजू अगरवाल, संगीता गोडबोले (पर्यटन), डी. के. सिंग (अपेडा चेअरमन), एस. के. सरंगीव (वाणिज्य सहसचिव) आदींनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. सिंग आदी उपस्थित होते.

कोकणामध्ये पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक क्षेत्रांत मोठी क्षमता आहे. मात्र, विकासाच्या दृष्टीने त्याचा फारसा विचार झालेला नाही. निर्यातक्षमता प्रचंड आहे, त्यासाठी मोठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. याला अधिकारी, संस्थांचे अधिकारी आदींना बोलावले जाईल. कालावधी ठरवून काम करून घेतले जाईल. तारकर्लीच्या धर्तीवर स्कुबा डायव्हिंगचे एक केंद्र रत्नागिरीत करण्यात येणार आहे. पर्यटनवाढीसाठी केरळच्या धर्तीवर ॲक्वॉकल्चर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरीत क्रूज (जहाज) प्रकल्प राबविणार. कोकम, काजू, चिकू तसेच देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याच्या प्रचार-प्रसिद्धीवर भर दिला जाणार आहे.
 

Web Title: Ratnagiri News action plan for distirct Suresh Prabhu comment