आठ दिवसांत हजार पुस्तकांची भर - अ‍ॅड. पटवर्धन

मकरंद पटवर्धन
रविवार, 13 मे 2018

रत्नागिरी - एक लाख पुस्तकांच्या संकल्पासाठी गेल्या आठ दिवसात रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात वाचक, संस्थांकडून एक हजार पुस्तके जमा झाली आहेत. त्यामुळे पुस्तकांची संख्या 95 हजार झाली असून आणखी पाच हजार पुस्तकांची गरज आहे. येत्या 100 दिवसांत ही पुस्तके सुद्धा जमा होतील, असा विश्‍वास वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

1828 मध्ये स्थापन झालेले हे वाचनालय अद्ययावत, संगणकीकृत आहे. लाख पुस्तकांच्या संकल्पाचे आवाहन कळल्यानंतर दररोज वाचक नवनवीन व घरातील अनेक पुस्तके जमा करत आहेत. चित्पावन ब्राह्मण संघाने चित्पावन कोष, स्वामी, अग्निपंख आदी पुस्तके दिली आहेत. विविध संस्था, व्यक्तींकडून पुस्तके मिळत आहेत. पत्रकार अनिल जोशी यांनी 100 पुस्तके देण्याचे मान्य केले आहे. तसेच जिल्हा बँक कर्मचारी, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कर्मचारी, अभिनेता दीपक करंजीकर, प्रशांत दीक्षित आदींकडून लवकरच पुस्तके मिळणार आहेत.

साधारण 30 जूनपर्यंत पुस्तके जमा करण्याचे आवाहन केले आहे. काही पुस्तके वाचनालय खरेदी करणार आहे. महाराष्ट्रातील विविध संस्थांशी संपर्क साधला असून त्यांच्यामार्फत पुस्तके मिळतील. लाखाचा संकल्प नक्की पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

टिळकांच्या काळातील 800 पुस्तके मिळणार

लोकमान्य टिळकांच्या काळातील 800 पुस्तके लवकरच वाचनालयाला मिळणार आहेत. मुळचे डिंगणी येथील व सध्या जाकादेवी येथे राहणारे डॉ. अरुण डिंगणकर हे त्यांच्या आजोबांचा पुस्तकांचा ठेवा वाचनालयाकडे सुपूर्द करणार आहेत. डिंगणी येथे ही पुस्तके असून टिळकांच्या काळातील अनेक पुस्तके, संदर्भग्रंथ त्यामध्ये आहेत. या पुस्तकांमुळे इतिहासाची पाने उलगडतील, असे पटवर्धन यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Ad Deepak Patvardhan information