अशोक वालम यांना जबरदस्तीने न्यायालयात हजर केल्याचा दावा

अमोल कलये
मंगळवार, 16 जानेवारी 2018

रत्नागिरी - रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना आज जबरदस्तीने न्यायालयात दाखल केले जात अाहे असा दावा आज त्यांच्या नातेवाईकांना केला.

रत्नागिरी - रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना आज जबरदस्तीने न्यायालयात दाखल केले जात अाहे असा दावा आज त्यांच्या नातेवाईकांना केला.

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत घेतलेल्या बैठकीत एजंटला मारहाण केल्याप्रकरणी रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांच्या पत्नीस काल पोलिसांनी अटक केली आहे. वालम यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने न्यायालयात हजर केले, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

यावर वालम यांच्या पत्नी अश्विनी यांनी प्रकृती अस्वस्थ असतानाही जबरदस्तीने अशोक यांना न्यायालयात हजर केले जात आहेत असा आरोप केला. त्यांची तब्बेत खालावली असल्याचाही दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचाही दावा यावेळी अश्विनी यांनी केला. 

 

Web Title: Ratnagiri News Ashok walam arrest case